सकाळी झाडू मारत होतो. बायको कौतुकाने माझ्याकडे बघत होती. आई माझ्याकडे काळजीयुक्त वात्सल्याने आणि कौतुकाने बघत होती. सासरे माझ्याकडे विजयी वात्सल्याने आणि स्वतःच्या लेकीकडे कौतुकाने बघत होते.
चार चाकं असलेलं काचेचं सेंटर टेबल मी जोरात सरकवलं. कडाडकड असा आवाज आला. घरातल्या दशदिशा दुमदुमल्या. सगळे चपापले. व्हिडिओ गेम खेळणारा धाकटा लेक दचकला आणि गेममधला त्याचा सैनिक गतप्राण झाला. व्हॉटस अॅपवर चॅटिंग करत असलेला मोठा लेकही दचकला. चुकून त्याने भलतीच स्मायली चॅटवर पाठवली असावी. कारण नंतर त्याच्या तोंडून चक् चक् असा विषाददर्शक उद्गार आला आणि एकाएकी त्याची फोनवरची धावपळ वाढली.
ज्याची भीती होती तेच झालं. माझ्या डौलदार सेंटर टेबलच्या चार चाकांपैकी एक चाक मोडून पडलं होतं. आणि शिवधनुष्य मोडून सीतेकडे प्रेमाने पहाणार्या विजयी रामाऐवजी, ते छातीवर पडलेल्या पराभूत रावणासारखा चेहरा करून उभा राहिलो. (रामायण बघण्याचे अप्रत्यक्ष फायदे होतात ते असे)
बायकोच्या चेहऱ्यावरील कौतुक मावळून तिथे क्रोधाग्नी प्रकटला. आईच्या चेहर्यावरील कौतुक मावळून तिथे काळजी आणि चिंतेने घर केलं. सासऱ्यांच्या चेहऱ्यावरील विजयी कौतुकाची भावना जाऊन तिथे 'तरी मला वाटलंच होतं की याच्यापेक्षा चांगला मुलगा मी माझ्या राजकुमारीला नवरा म्हणून शोधून दिला असता. पण काय करणार माझ्या छोट्या परीला हाच गडबड्या आवडला' असे भाव आले.
आणि एकाएकी मला जाणवलं की वॉशिंग मशीन, कपडे वाळत घालण्याच्या दोऱ्या वरखाली करुन देणं, भांडी घासणं, केर काढणं आणि लादी पुसणं यातल्या कित्येक कामांपासून सुटका करून घेण्याचा हुकमी एक्का माझ्या हाती लागला आहे. आता विजयी हास्य करायची पाळी माझी होती.

No comments:
Post a Comment