माझे फेसबुक मित्र श्री मुकेश माचकर यांनी, ऑक्सफॅमने दिनांक १६ जानेवारी २०१७ ला प्रसिद्ध केलेल्या संपत्तीच्या असमान वाटपावर टीका करणारा, श्री राजेश घासकडवी यांनी लिहिलेला बिगुल या संस्थळावरचा लेख फेसबुकवर शेअर केला. त्यावर माझा मित्र आल्हाद महाबळ याने मला,
दारिद्र्य निर्देशांकासाठी त्यांनी PQLI (Physical Quality of Life Index -- भौतिक जीवनमानाची गुणवत्ता) हे एकक वापरण्यास सुचवले. यात साक्षरता, बालमृत्यू आणि आयुर्मान यांना वापरून समाजाचा दारिद्र्य निर्देशांक काढला जातो. पण यातील बालमृत्यू आणि आयुर्मान या दोन मुद्द्यांची सरमिसळ होत असल्याने १९९० मध्ये भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी HDI (Human Development Index मानवी विकास निर्देशांक) हे एकक वापरण्यास सुचवले. यात जन्मवेळचा मृत्युदर, प्रौढ साक्षरतेचे प्रमाण आणि जीवनमानाचा स्तर या तिघांना वापरायचे ठरले. २०१० मध्ये याच्या सूत्रात अजून सुधार केला गेला. याच्या जोडीला १९९७ मध्ये HPI (Human Poverty Index मानवी दारिद्र्य निर्देशांक) काढला जाऊ लागला. विकसनशील आणि विकसित देशांसाठी याची सूत्रे वेगवेगळी होती. शेवटी २०१० मध्ये HPI वापरणे बंद करून MPI (Multidimensional Poverty Index) काढणे सुरु झाले. त्यामुळे सध्या दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी HDI आणि MPI दोन्ही वापरले जातात.
दारिद्र्य निर्देशांक मोजला जाण्याची सुरवात १९७० पासून कशी झाली आणि त्याची गणना करण्याच्या पद्धतीत कश्या प्रकारे सुधार होत गेला ते मी वर थोडक्यात सांगितलं. पण दारिद्र्य निर्देशांक कसा काढावा ते ठरायच्याआधीपासून समाजातील विषमता निर्देशांक मोजण्यास सुरवात झालेली होती.
मग १९१२ मध्ये इटालियन सांख्यिकी तज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ कोरॅडो जिनी याने लॉरेन्झ साहेबांचा आलेख वापरून संपत्ती आणि उत्पन्नाच्या वाटपाचे किती विचलन (Deviation) किंवा पांगापांग (Dispersion) झाली आहे ते सांगणारा निर्देशांक कसा काढायचा त्याची पद्धत सांगितली. वरच्या आकृतीमधील जो भाग A या अक्षराने दाखवला आहे त्याचे (A+B) म्हणजे ४५अंशाच्या रेषेखालच्या एकूण भागाशी असलेले गुणोत्तर म्हणजे जिनी निर्देशांक. समीकरण मांडायचे झाल्यास;
मोठमोठ्या कंपन्या रोजगार निर्मिती करतात या ताकदीपायी त्यांना करातून सूट हवी असते. त्या सरकारे उलथवतात, त्या सामान्य लोकांच्या आयुष्याशी सहज खेळू शकतात. त्यांनादेखील स्खलनशील आणि स्वार्थलोलुप माणसेच चालवतात, आणि जर या कंपन्यांवर मूठभर लोकांचीच मालकी राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा फार कमकुवत होतो. म्हणून उत्पन्नाच्या विषमतेच्या प्रश्नाइतकाच संपत्तीच्या विषमतेचा मुद्दा ऑक्सफॅमला महत्वाचा वाटत असावा.
आणि जर वाचायचा कंटाळा आला असेल तर जेम्स ग्लॅटफेल्डर यांनी या विषयावर एक छोटेखानी (१४ मिनिटाचे) भाषण दिले आहे ते ऐकून पहा.
त्याशिवाय श्री. घासकडवींच्या लेखात नसलेल्या दुसऱ्या आक्षेपाला उत्तर देताना ऑक्सफॅम म्हणते,
म्हणून मला असे वाटते की श्री. घासकडवी यांनी ऑक्सफॅमच्या संपत्ती वाटपातील विषमतेच्या डेटाला उत्पन्न विषमतेच्या डेटाशी जोडल्याने त्यांचे निष्कर्ष ऑक्सफॅमच्या संदर्भात नकारात्मक आले आहेत. आणि आज होणाऱ्या संपत्तीच्या असमान वाटपाने भविष्यात होऊ शकणाऱ्या उपद्रवाची पूर्ण कल्पना न आल्याने अनेकांना श्री. घासकडवींचे निष्कर्ष चटकन पटू शकतात.
Economically, Income is a function of Assets. मालमत्तेतून कुठलंही उत्पन्न जर मिळत नसेल तर त्या मालमत्तेला विक्रीला मिळू शकणारी संभाव्य किंमत यापलीकडे अर्थ नसतो. श्रीमंती उत्पन्नाने ठरते. मालमत्तेच्या संभाव्य किंमतीमुळे नाही. त्यामुळे माझ्या मते श्रीमंती मोजायला उत्पन्न न मोजता मालमत्ता मोजणं हे मुळातच चूक आहे.असा प्रश्न विचारला. त्यावर विचार करताना आणि मग संदर्भ शोधताना हे लिखाण झालं.
Anand More हे लॉजिक बरोबर आहे की गंडलंय?
“गरिबी हटाओ” हा देशोदेशीच्या सत्ताधाऱ्यांचा कायमस्वरूपी कार्यक्रम असतो. पण यासाठी गरिबी म्हणजे काय? हे ठरवणे आवश्यक असते.
'साधनांचा तुटवडा', ही गरिबीची ढोबळ व्याख्या झाली. पण या व्याख्येने जगातला प्रत्येक माणूस गरीब ठरू शकतो. म्हणून गरिबीपेक्षा दारिद्र्य हा शब्द महत्वाचा ठरतो. ज्याच्याकडे सामान्य जीवन जगण्याच्या साधनांचादेखील तुटवडा असतो तो दरिद्री. मग सामान्य जीवन म्हणजे काय ते ठरवणे महत्वाचे ठरते. दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी आयुर्मान, जन्माच्या वेळेचा मृत्यूदर, साक्षरता, प्रौढ शिक्षण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे वेगवेगळे मानक वापरता येतील असे १९७० च्या दशकात मॉरिस डेव्हिड मॉरिस यांना वाटले.
'साधनांचा तुटवडा', ही गरिबीची ढोबळ व्याख्या झाली. पण या व्याख्येने जगातला प्रत्येक माणूस गरीब ठरू शकतो. म्हणून गरिबीपेक्षा दारिद्र्य हा शब्द महत्वाचा ठरतो. ज्याच्याकडे सामान्य जीवन जगण्याच्या साधनांचादेखील तुटवडा असतो तो दरिद्री. मग सामान्य जीवन म्हणजे काय ते ठरवणे महत्वाचे ठरते. दारिद्र्य निर्देशांक काढण्यासाठी आयुर्मान, जन्माच्या वेळेचा मृत्यूदर, साक्षरता, प्रौढ शिक्षण, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता हे वेगवेगळे मानक वापरता येतील असे १९७० च्या दशकात मॉरिस डेव्हिड मॉरिस यांना वाटले.
दारिद्र्य निर्देशांकासाठी त्यांनी PQLI (Physical Quality of Life Index -- भौतिक जीवनमानाची गुणवत्ता) हे एकक वापरण्यास सुचवले. यात साक्षरता, बालमृत्यू आणि आयुर्मान यांना वापरून समाजाचा दारिद्र्य निर्देशांक काढला जातो. पण यातील बालमृत्यू आणि आयुर्मान या दोन मुद्द्यांची सरमिसळ होत असल्याने १९९० मध्ये भारतीय अर्थतज्ञ अमर्त्य सेन आणि पाकिस्तानी अर्थतज्ञ महबूब उल हक यांनी HDI (Human Development Index मानवी विकास निर्देशांक) हे एकक वापरण्यास सुचवले. यात जन्मवेळचा मृत्युदर, प्रौढ साक्षरतेचे प्रमाण आणि जीवनमानाचा स्तर या तिघांना वापरायचे ठरले. २०१० मध्ये याच्या सूत्रात अजून सुधार केला गेला. याच्या जोडीला १९९७ मध्ये HPI (Human Poverty Index मानवी दारिद्र्य निर्देशांक) काढला जाऊ लागला. विकसनशील आणि विकसित देशांसाठी याची सूत्रे वेगवेगळी होती. शेवटी २०१० मध्ये HPI वापरणे बंद करून MPI (Multidimensional Poverty Index) काढणे सुरु झाले. त्यामुळे सध्या दारिद्र्याचा अंदाज घेण्यासाठी HDI आणि MPI दोन्ही वापरले जातात.
दारिद्र्य निर्देशांक मोजला जाण्याची सुरवात १९७० पासून कशी झाली आणि त्याची गणना करण्याच्या पद्धतीत कश्या प्रकारे सुधार होत गेला ते मी वर थोडक्यात सांगितलं. पण दारिद्र्य निर्देशांक कसा काढावा ते ठरायच्याआधीपासून समाजातील विषमता निर्देशांक मोजण्यास सुरवात झालेली होती.
१९०५ मध्ये मॅक्स लोरेंझ या अमेरिकी अर्थतज्ञाने, समाजात झालेले उत्पन्नाचे आणि संपत्तीचे वाटप दाखवणारा आलेख कसा तयार करायचा ते दाखवले. त्याची आकृती खाली देतो.
Image Source : Wikipedia |
यात आडव्या X अक्षावर लोकसंख्या दाखवली असते. साधारणपणे लोकसंख्येचे पाच भाग केले जातात. आणि उभ्या Y अक्षावर उत्पन्न दाखवले जाते. याचे कितीही भाग करता येऊ शकतात. पण आपण उत्पन्नाचेही पाच भाग केले असे समजूया. आता जर उत्पन्नाची विषमता नसेल तर समाजातील पहिल्या २०% लोकांकडे २०% उत्पन्न असेल, ४०% लोकांकडे मिळून ४०% उत्पन्न असेल, ६०% लोकांकडे मिळून ६०% उत्पन्न, ८०% लोकांकडे ८०% आणि १००% लोकांकडे मिळून १००% उत्पन्न जमा होईल. म्हणजे उत्पन्नाची समानता दाखवणारी रेघ ४५ अंशाचा कोन करेल. पण वस्तुस्थिती अशी नसते.
बहुतेक समाजात उत्पन्नाचे आणि संपत्तीचे वाटप असमान किंवा विषम असते. म्हणजे लोकसंख्या उत्पन्न आणि संपत्तीच्या दृष्टीने एकाच पातळीवर नसून तिची एक उभी उतरंड तयार होते. आता जर आपण या अश्या उतरंडीवाल्या समाजाच्या लोकसंख्येचे पाच भाग केले तर त्याला आपण तळाचे २०% लोक, मधले अमूक टक्के लोक आणि सगळ्यात वरती असलेले शीर्षस्थ २०% लोक अशी मांडणी तयार होते. आणि या लोकांत त्या समाजाचे उत्पन्न कसे विभागलेले असते? तर शीर्षस्थ लोकांकडे जास्तीत जास्त उत्पन्न व संपत्ती जमा होऊ शकते तर तळाकडच्या २०% लोकांकडे कमीत कमी उत्पन्न आणि संपत्ती असते. म्हणजे या समाजातील उत्पन्न आणि संपत्तीच्या वाटपाची रेघ, ४५ अंशाचा कोन करणारी न राहता ती एक अंतर्वक्र रेष तयार होते. जितकी विषमता जास्त तितकी वक्रता जास्त. हा झाला लॉरेन्झ कर्व्ह.
मग १९१२ मध्ये इटालियन सांख्यिकी तज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ कोरॅडो जिनी याने लॉरेन्झ साहेबांचा आलेख वापरून संपत्ती आणि उत्पन्नाच्या वाटपाचे किती विचलन (Deviation) किंवा पांगापांग (Dispersion) झाली आहे ते सांगणारा निर्देशांक कसा काढायचा त्याची पद्धत सांगितली. वरच्या आकृतीमधील जो भाग A या अक्षराने दाखवला आहे त्याचे (A+B) म्हणजे ४५अंशाच्या रेषेखालच्या एकूण भागाशी असलेले गुणोत्तर म्हणजे जिनी निर्देशांक. समीकरण मांडायचे झाल्यास;
G = A / (A + B)
असे मांडता येईल.
जितका A चा आकार लहान तितकी विषमता कमी आहे असे मानता येते. म्हणून जिनी निर्देशांक शून्याजवळ जाणारा असतो तर जितका A चा आकार मोठा तितकी विषमता जास्त म्हणून जिनी निर्देशांक एकजवळ जाणारा असतो.
जितका A चा आकार लहान तितकी विषमता कमी आहे असे मानता येते. म्हणून जिनी निर्देशांक शून्याजवळ जाणारा असतो तर जितका A चा आकार मोठा तितकी विषमता जास्त म्हणून जिनी निर्देशांक एकजवळ जाणारा असतो.
ही पद्धत इतकी सोपी आणि प्रभावी आहे की विषमता निर्देशांक काढण्याच्या या पद्धतीला वापरून समाजातील विविध प्रकारच्या विषमता काढता येणे शक्य झाले. आणि या निर्देशांकाचा बोलबाला झाला. याचा अर्थ असा नाही की जिनी निर्देशांक सुयोग्य आहे. यातही त्रुटी आहेतच. परंतू मुद्दा जिनी निर्देशांकाच्या अचूकतेचा नसल्याने जिनीशिवाय इतर कुठले निर्देशांक वापरता येऊ शकतात? हा मुद्दा मी बाजूला ठेवतो आहे.जिनी निर्देशांकाच्या गणनेमध्ये अनेक संख्याशास्त्रीय त्रुटी आहेत. त्यातील या लेखाच्या दृष्टीने महत्वाची त्रुटी म्हणजे, तो तो एकावेळी एकाच विषमतेचे मापन करू शकतो. म्हणजे जर उत्पन्नाच्या विषमतेचा जिनी निर्देशांक काढला तर त्यामुळे संपत्तीच्या निर्देशांकाबद्दल काहीही कळंत नाही. याचाच अर्थ असा होतो की, ज्या समाजात उत्पन्नाची विषमता नगण्य असेल त्या समाजात संपत्तीची विषमता देखील नगण्य असेलच असे नाही. ती किती आहे ते समजून घेण्यासाठी संपत्तीच्या वाटणीचा वेगळा जिनी निर्देशांक काढावा लागेल.
आता कोणी असे म्हणेल (जे तू पण म्हणतो आहेस) की संपत्तीचे असमान वाटप झाल्यास काय फरक पडतो? तुझेच शब्द वापरायचे झाल्यास,
“मालमत्तेतून कुठलंही उत्पन्न जर मिळत नसेल तर त्या मालमत्तेला विक्रीला मिळू शकणारी संभाव्य किंमत यापलीकडे अर्थ नसतो. श्रीमंती उत्पन्नाने ठरते. मालमत्तेच्या संभाव्य किंमतीमुळे नाही. त्यामुळे माझ्या मते श्रीमंती मोजायला उत्पन्न न मोजता मालमत्ता मोजणं हे मुळातच चूक आहे.”
परंतू माझ्या मते अनुत्पादक संपत्ती इतकी उपद्रवशून्य नसते.
कारण संपत्ती केवळ उत्पन्नकारक नसते तर ती अधिकारकारक देखील असते. संपत्ती सत्तेला बळ देते. सत्तेला आणि तिच्या निर्णयाला नैतिक अधिष्ठान देऊ शकते. सत्ताधारी कुठे झुकतील, ते ठरवते. इतकेच काय पण कररचना कशी होईल, तेदेखील संपत्ती ठरवते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. थोडक्यात, आज अनुत्पादक वाटणारी संपतीदेखील भविष्याच्या दिशेवर अफाट परिणाम घडवून आणू शकते.
हे मुद्दे २००८च्या आर्थिक पडझडीमुळे ऐरणीवर आले आहेत. Occupy Wall Street च्या चळवळीचा जन्म यातूनच झाला होता. ओबामांच्या काळात उत्पन्नाची विषमता कमी झाली असली तरी संपत्तीची विषमता वाढली आहे. आणि हे सर्व केवळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगात होत आहे. म्हणून हा मुद्दा महत्वाचा ठरतो.
हे मुद्दे २००८च्या आर्थिक पडझडीमुळे ऐरणीवर आले आहेत. Occupy Wall Street च्या चळवळीचा जन्म यातूनच झाला होता. ओबामांच्या काळात उत्पन्नाची विषमता कमी झाली असली तरी संपत्तीची विषमता वाढली आहे. आणि हे सर्व केवळ अमेरिकेतच नव्हे तर पूर्ण जगात होत आहे. म्हणून हा मुद्दा महत्वाचा ठरतो.
मोठमोठ्या कंपन्या रोजगार निर्मिती करतात या ताकदीपायी त्यांना करातून सूट हवी असते. त्या सरकारे उलथवतात, त्या सामान्य लोकांच्या आयुष्याशी सहज खेळू शकतात. त्यांनादेखील स्खलनशील आणि स्वार्थलोलुप माणसेच चालवतात, आणि जर या कंपन्यांवर मूठभर लोकांचीच मालकी राहिली तर जागतिक अर्थव्यवस्थेचा डोलारा फार कमकुवत होतो. म्हणून उत्पन्नाच्या विषमतेच्या प्रश्नाइतकाच संपत्तीच्या विषमतेचा मुद्दा ऑक्सफॅमला महत्वाचा वाटत असावा.
या बद्दल ऑक्सफॅमच्या ब्लॉगवरची १ नोव्हेंबर २०११ ची ही पोस्ट पहाता येईल.
या पोस्टमध्ये उद्घृत केलेला जेम्स ग्लॅटफेल्डर यांचा मूळ लेख, तुला पब्लिक लायब्ररी ऑफ सायन्सच्या वेबसाईटवर इथे वाचता येईल.
आणि जर वाचायचा कंटाळा आला असेल तर जेम्स ग्लॅटफेल्डर यांनी या विषयावर एक छोटेखानी (१४ मिनिटाचे) भाषण दिले आहे ते ऐकून पहा.
या भाषणात त्यांनी मॅक्स वेबर यांच्या Potential Power या संकल्पनेला उद्घृत केले आहे. या संकल्पनेमध्ये “Probability of imposing one's own will despite the opposition from others” किंवा, “इतरांचा विरोध असूनही आपली मते इतरांवर लादता येण्याची शक्यता” हिचा विचार केला जातो. आणि संपत्ती अश्या ताकदीची जन्मदात्री असते. त्यामुळे उत्पन्नाच्या विषमतेइतकीच संपत्तीची विषमता मिटवणे देखील महत्वाची असते.
बिगुलमधल्या लेखात श्री. घासकडवी म्हणतात की ऑक्सफॅम जिनी निर्देशांक सोडून भलतेच आकडे वापरते आहे. पण मला तसे वाटत नाही. हे खरे आहे की ऑक्सफॅमला जिनी निर्देशांकाबद्दल फार कमी प्रेम आहे आणि ते ऍटकिन्सन निर्देशांक किंवा पाल्मा निर्देशांक वापरण्यावर भर देतात. पण माझ्या मते, जिनी निर्देशांक आणि ऑक्सफॅमच्या डेटात श्री. घासकडवींना दिसलेला फरक, निर्देशांकाच्या गणना पद्धतीत केलेल्या फरकाने आलेला नसून वेगवेगळे निर्देशांक काढल्यामुळे आलेला आहे. श्री. घासकडवी उत्पन्न विषमतेच्या जिनी निर्देशांकाबद्दल बोलत आहेत तर ऑक्सफॅम संपत्तीवाटप विषमतेच्या निर्देशांकाबद्दल बोलत आहे. जगभरात कदाचित उत्पन्न तफावत कमी होत असेल पण संपत्तीच्या वाटणीत विषमता वाढते आहे आणि हे भविष्यकाळासाठी धोक्याचे आहे हा मुद्दा श्री. घासकडवींच्या लेखात मला दिसला नाही.
त्याशिवाय, अमेरिकेत आणि युरोपमध्ये चीनपेक्षा जास्त गरिबी आहे असा श्री. घासकडवींनी लिहिलेला मुद्दा मला मला ऑक्सफॅमच्या या रिपोर्टमध्ये दिसला नाही. पण ऑक्सफॅमच्या रिपोर्टचा सूर असा आहे की चीन आणि इतर विकसनशील देशातील संपत्तीच्या वाटपातील विषमतेपेक्षा अमेरिका आणि युरोपातील संपत्तीचे वाटप विषम झालेले आहे. आणि ते खरे असावे असे मला ब्रेक्झिट किंवा ट्रम्पविजय सारख्या घटनांतून दिसणाऱ्या जनभावनेमुळे जाणवते.
श्री. घासकडवींनी लेखाचा समारोप करताना नुकत्याच डॉक्टर झालेल्या आणि वर्षाला लाख डॉलरचे उत्पन्न असलेल्या व्यक्तीचे उदाहरण घेतले आहे. २०१५ मध्ये टाईमच्या जेकब डेव्हिडसनने लिहिलेल्या लेखातपण अश्याच अर्थाचे एक उदाहरण आहे. या आक्षेपाला ऑक्सफॅमने दिलेले उत्तर असे आहे,
The inequality of wealth that these calculations illustrate has attracted a lot of attention, both to the obscene level of inequality they expose and to the underlying data and the calculations themselves. Two common challenges are heard.
First, that the poorest people are in net debt, but these people may be income-rich thanks to well-functioning credit markets (think of the indebted Harvard graduate). However, in terms of population, this group is insignificant at the aggregate global level, where 70% of people in the bottom 50% live in low-income countries. The total net debt of the bottom 50% of the global population is also just 0.4% of overall global wealth, or $1.1 trillion. If you ignore the net debt, the wealth of the bottom 50% is $1.5 trillion. It still takes just 56 of the wealthiest individuals to equal the wealth of this group.
The second challenge is that changes over time of net wealth can be due to exchange rate fluctuations, which matter little to people who want to use their wealth domestically.
त्याशिवाय ऑक्सफॅम, क्रेडिट स्वीसचा डेटा वापरते; स्वतःचा डेटा नाही हा आक्षेप आणि ऑक्सफॅमच्या निष्पक्षतेवर काही प्रश्नचिन्ह उभी आहेत हे मला मान्य आहे पण तरीही मला या रिपोर्टच्याबाबतीत ऑक्सफॅमवर विश्वास ठेवावासा वाटतो.
मला या रिपोर्ट बद्दल जे काही सांगायचे होते ते सांगून झाले आहे. आणि मला वाटतं तुझ्या अनुत्पादक संपत्तीविषयी तू विचारलेल्या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मी देऊ शकलो असेन. पण एक मुद्दा आणखी जाणवतो तो फॉर्च्यून मासिकातल्या २०१५ मधील या लेखात आला आहे यात मायकेल कझिन या डाव्या विचारसरणीच्या संपादकाला उद्घृत करीत लेखक क्रिस मॅथ्यूस विचारतो की, “जर खरेच १% लोकांकडे इतकी संपत्ती आहे तर मग बाकीचे ९९% लोक रस्त्यावर येऊन लढा देताना का दिसत नाहीत?”
याची मला दोन उत्तरे दिसतात. एक म्हणजे ब्रेक्झिट आणि ट्रम्पविजय या दोन घटना लोक रस्त्यावर आल्याच्या द्योतक आहेत. आणि लोकांनी याऐवजी जाळपोळ का केली नसावी? यासाठी मला वाटतं हा व्हिडीओ योग्य कारणे सांगतो.
“आपण जे आहे ते समजून न घेता जे असायला हवं तेच होतंय असं समजून आपले निर्णय घेत असतो. त्यामुळे लोकांना खरी विषमता जितकी आहे तितकी जाणवत नसावी आणि जितकी विषमता असणे त्यांना योग्य वाटते तितकी विषमता आहे अश्या समजुतीने त्यांचे निर्णय होत असावेत." हे या व्हिडीओचे सार आहे. मी सार दिले असले तरी तू व्हिडीओ पूर्ण पहाशील अशी मला खात्री आहे.
हे सगळं लिहिण्याच्या गडबडीत माझा या आठवड्याचा दाढीवरचा लेख बारगळला. त्याचे पाप तुझ्या माथ्यावर.

No comments:
Post a Comment