काजळमाया हे जी ए कुलकर्णींचे एक पुस्तक. लहानपणी वाचलेले. नंतर विसरलेलो. पुन्हा वाचायला घेतले. काल त्यातली कळसूत्र ही कथा वाचत होतो.
दूर डोंगरात राहणारी, आदिमानवाच्या आस्था बाळगणारी आणि निसर्गावर अंधविश्वास ठेवणारी एक टोळी. त्यांचा प्रमुख म्हणजे लाल गरुडाचं चिन्ह अंगावर रंगवलेला माणूस. दर वर्षी उन्हाळ्याच्या शेवटी आरश्याच्या तुकड्यात दिसणाऱ्या सूर्याचे तुकडे करून, पकडून ठेवलेल्या आणि तासभर आधी डिवचत ठेवलेल्या जिवंत नागाचे दाताने लचके तोडून केलेल्या पर्जन्य नृत्याने देव प्रसन्न होतो आणि मग पाउस पडतो अशी श्रद्धा आणि हे पर्जन्य नृत्य जर स्त्रियांनी बघितले तर सहा वर्ष पाऊस पडत नाही अशी अंधश्रद्धा असलेली टोळी.
त्यांच्या वृद्ध लाल गरुडाचा मुलगा टोळी सोडून गेलेला असताना आणि मृत्यूपंथाला लागलेला असताना एका यात्रिकाला सापडतो. तो मरण्यापूर्वी यात्रिकाला एक काम सांगतो की माझ्या गावी जाऊन माझे जीवन व्यर्थ गेले एव्हढा निरोप दे अशी कामगिरी देतो. त्याला मूठमाती दिल्यावर यात्रिकाचा स्वार्थ जागा होतो. तो लाल गरुडाच्या गावी जातो. तिथे वृद्धापकाळाने अंधत्व आलेला लाल गरुड त्याला आपला मुलगा समजून उत्तराधिकारी घोषित करतो आणि स्वतः समाधी म्हणावी असा मृत्यू कवटाळतो.
यात्रिक आता लाल गरुड बनतो. त्याला टोळीचे हिंसक जीवन आवडत नाही. पण प्रमुखपदाचे फायदे हवे असतात. सर्वांचा विश्वास असतो की, डोंगरापलीकडे एक सम्राट आहे जो या टोळीवर प्रचंड प्रेम करतो आणि आपल्या इच्छा लाल गरुडाकरवी टोळीपर्यंत पोहोचवतो. लाल गरुड बनलेला यात्रिक, या विश्वासाचा फायदा घेऊन स्वतःच्या सुखोपभोगासाठी नवनवीन कल्पना सम्राटाच्या इच्छेच्या नावाखाली सर्वांच्या गळी उतरवतो. एकदा झालेला प्रखर विरोध सोडल्यास सगळेजण, सम्राटाच्या नावाने यात्रिकाने केलेल्या विकृत आणि इतरांची गुलामी वाढवणाऱ्या मागण्या विनातक्रार मान्य करीत जातात.
आणि मग एकदा याला उपरती होते. एका पर्जन्य नृत्यानंतर तो सगळ्यांना सगळे खरे सांगतो. सांगतो की डोंगरापलीकडे कोणी सम्राट नाही. पाउस तुमच्या आडदांड पर्जन्य नृत्यामुळे पडत नाही. तो निसर्गाच्या चक्राने पडतो. तुमची टोळी नाहीशी झाली तरी तो तसाच त्याच्या वेळी निर्विकारपणे पडतंच राहील. मी तुम्हाला फसवले. तुम्ही तुमच्या अंधश्रद्धेच्या बेड्या तोडा. प्राचीन परंपरेच्या बेड्या तोडा. असे काय काय सांगतो. लोक खवळतात. त्याला घोड्याला बांधून फरफटत नेतात. माफी मागायला सांगतात. तोंडात आलेले चुळकाभर रक्त थुंकून तो माफी मागायला नकार देतो. वृद्धत्व, मद्य किंवा पिशाच्च बाधा यापैकी कशानेही तो बरळत नाही आहे असेच ठणकावून सांगतो. लोकांना ते चूक आहेत यापेक्षा त्यांच्या गुलामीच्या बेड्या दाखवून दिल्याचा अधिक राग येतो, हे सत्य त्याला उमगते.
धर्माविरुद्ध, सम्राटाविरुद्ध, परंपरांविरुद्ध बोलल्याने, टोळीतले सर्व त्याच्या शरीरात अणकुचीदार हाडे ठोकून मारण्याची शिक्षा ठरवितात. ती अमलात आणली जाते. तीव्र शारीरिक वेदनांच्या दु:ख्खाने पण निदान शेवटी तरी खरे बोललो या समाधानाने अंगात तीक्ष्ण हाडे ठोकलेला तो मृत्यूची वाट बघत असताना, क्षितिजावर एक यात्रिक दिसू लागतो. तो येउन सगळ्यांना जुन्या आठवणी देतो. तो स्वतःला, आता शिक्षा झालेल्या लाल गरुडाचा परागंदा झालेला मुलगा म्हणून सांगतो. लाल गरुडाने जे काही केले ते पण सम्राटाच्या इच्छेने हे लोकांना पटवून देतो. लाल कोणी विश्वास ठेवत नाही. मला प्रमुखपदाची इच्छा नाही असे सांगतो. मी वडिलांच्या पापाचे प्रायश्चित्त घेऊन आलो आहे. सम्राटाच्या दरबारात जाऊन त्याच्याकडून क्षमा घेऊन आलो आहे असे सांगतो. कोणी विश्वास ठेवत नाही. मग तो बंदूक काढतो आणि सांगतो की ही सम्राटाने दिलेली खूण आहे. त्याने तो दूरवर बसलेले गिधाड मारून दाखवतो. लोकांचा विश्वास बसतो. आणि तो नवा लाल गरुड बनतो.
____________________________________________________
____________________________________________________
लोकांचा विश्वास बसतो म्हणण्यापेक्षा लोक विश्वास ठेवायला अधीर झालेले असतात. मानवाला हजारो वर्ष झाली पृथ्वीवर जन्म घेऊन आणि तितकीच वर्ष झाली स्वतःची संस्कृती बनवून. तरीही या सांस्कृतिक जगात जन्माला येणारा प्रत्येक जण अजूनही जन्माला येताना आदिमानवाच्या मेंदूला घेऊन येत असतो. न शिकवता त्याला अंधाराची, अज्ञाताची भीती वाटत असते.
संस्कृती आणि शिक्षण त्याला पूर्वजांचे संचित ज्ञान देते. पण ज्ञानाचा प्रदेश सांत असतो तर अज्ञानाचा अनंत. म्हणून माहित असलेल्या गोष्टींची भीती गेली तरी संपूर्ण आयुष्याची भीती कधी जात नाही. त्याशिवाय संस्कृती, परंपरारूपी गुरु आपली गुरुदक्षिणा मागतो, तीही प्रश्न विचारण्याच्या अंगठ्यासारख्या क्षमतेच्या स्वरूपात. आधी विश्वास ठेव, प्रश्न विचारणं बंद कर, सांगतो ते ऐक, वयाचा मान ठेव, पूर्वज चुकीचे कसे असतील? या पायावरच संस्कृतीचे इमले चढतात.
अंधाराचं, अनंत अज्ञानाचं अस्तित्वच आपण नाकारतो. मनातल्या बागुलबुवाला हरवायला आपण सर्वशक्तिमान आणि सार्वभौम सम्राट निर्माण करतो. त्यावर विश्वास ठेवतो. त्याला आपले जीवन अर्पण करण्याच्या नाटकातून आपले स्वार्थ साधून घेतो. त्याच्या वरच्या विश्वासाच्या चादरीआड आपले अज्ञान लपवितो. किंबहुना विश्वास हेच परमज्ञान असले भयंकर तत्वज्ञान तयार करतो.
मग आला कुणी चार्वाक, कुणी येशू, कुणी डॉन क्विक्झोट की आपण बिथरतो. आपले विश्वास विस्कटतात. आपली भूमी हादरते. नागडे सत्य वाकुल्या दाखवू लागते. अंधार दाटतो. विश्वासाच्या चादरीखाली दडवलेले अज्ञान धाडकन बाहेर येते. मग चार्वाकाला जाळावेसे वाटते, येशूला क्रूसावर चढवावेसे वाटते. डॉन पुन्हा धर्मगुरूंचा उपदेश ऐकून शहाणा झाला तरच सुटतो.
निखळ सत्य सांगणाऱ्या, अप्प दीपो भव: सांगणाऱ्या प्रेषितापेक्षा आपल्याला हवा असतो तो सम्राटाशी प्रत्यक्ष करार करून आलेला, किंवा त्याचे दृष्टांत होणारा किंवा, सम्राटाची आपल्यावर कशी कृपा आणि आपण त्याचे किती लाडके आहोत ते सांगणारा प्रेषित. इतकेच काय आपण येशूला, बुद्धाला देखील सम्राटाचे अवतार मानून त्यांची देवळे तरी बांधतो किंवा चार्वाकाला आणि प्रत्येकाला स्वत:ची श्रद्धा ठेवू देणाऱ्या वाक्यांना सैतानी मानून किंवा सम्राटाच्या इच्छेचे वेगळे प्रकटन म्हणून बासनात गुंडाळून ठेवतो. अंतिम ज्ञानाचा उद्घोष करणारे सर्व प्रेषित एकतर खोटे लाल गरुड असतात किंवा मग त्यांचे अनुयायी ज्ञानापेक्षा विश्वासावर अधिक विश्वास ठेवून अज्ञानाची पूजा करीत बसतात.
Man of La Mancha चे हे गाणे
To dream the impossible dream
To fight the unbeatable foe
To bear with unbearable sorrow
To run where the brave dare not go
To fight the unbeatable foe
To bear with unbearable sorrow
To run where the brave dare not go
To right the unrightable wrong
To love pure and chaste from afar
To try when your arms are too weary
To reach the unreachable star
To love pure and chaste from afar
To try when your arms are too weary
To reach the unreachable star
This is my quest
To follow that star
No matter how hopeless
No matter how far
To follow that star
No matter how hopeless
No matter how far
To fight for the right
Without question or pause
To be willing to march into Hell
For a heavenly cause
Without question or pause
To be willing to march into Hell
For a heavenly cause
And I know if I'll only be true
To this glorious quest
That my heart will lie peaceful and calm
When I'm laid to my rest
To this glorious quest
That my heart will lie peaceful and calm
When I'm laid to my rest
And the world will be better for this
That one man, scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable star!
That one man, scorned and covered with scars
Still strove with his last ounce of courage
To reach the unreachable star!
आपल्याला सगळ्यांना म्हणायला ऐकायला फार आवडत असले तरी शेवटी आपली सगळ्यांची वर्तणूक Life ऑफ Brian मधल्या Brian च्या तोंडून तो प्रेषित आहे हे वदवून घेऊन त्याला नमस्कार करणाऱ्या या जमावासारखीच असते.
(पूर्ण सीन विनोदी अंगाने आपल्या मूर्खपणावर भाष्य करतो. म्हणून मी तर पूर्ण सीन बघायला सांगीन. पण ज्यांना घाई आहे, त्यांनी ३:४५ पासून सुरु करावे.)
No comments:
Post a Comment