भाग १ | भाग २ | भाग ३ | भाग ४ | भाग ५ | भाग ६
----------------------------------
ही सगळी कहाणी सुरु झाली दिवाळी पासून . मला कल्पनाच नव्हती की मी या कहाणीचा हिरो आहे म्हणून. म्हणून आधी सगळे अनुभव टिपून ठेवले नव्हते. त्यामुळे आता जसे तुकड्या तुकड्याने आठवतायत तसे लिहितो. जर दोन तुकड्या मधलं अंतर जास्त वाटलं तर खुशाल समजा की चाळीशीच्या उंबरठ्यावर असल्याने मध्ये मध्ये येणाऱ्या विरक्तीच्या झटक्याने, मी या सर्व उपद्व्यापातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत असीन.

---------------
हा तर मी काय म्हणत होतो. २०१५ ची दिवाळी आली. ऑफिस मधल्या मुलींनी ऑफिस सजवायचा घाट घातला. त्यांचा उत्साह पाहून मी देखील हो म्हटलं. पोरींनी छान सजवलं ऑफिस. मी पण खूष झालो. त्यांच्या कामगिरीचे फोटो बिटो काढले आणि मग सरांबरोबर फोटो काढूया अशी कल्पना एकीच्या सुपीक डोक्यातून निघाली. (डोके नेहमी सुपीकच का असते कुणास ठावूक? एकही नापीक, दुष्काळी, गेला बाजार कोरडवाहू वगैरे का नसावे ? असो इथे कंस थांबवतो, उगाच तुम्हाला माझ्या डोक्याला कुठली विशेषणे द्यायची त्याची यादी मीच करून द्यायला नको) दिवाळीच्या आनंदाच्या भरात मी देखील या कल्पनेला हो म्हणून, फोटो काढायला मागे उभ्या असलेल्या या मुलींसमोर बसलो. आणि घात झाला. “जे न देखे रवी ते देखे कवी”, च्या चालीवर मला नवीन साक्षात्कार झाला. "जे न दाखवी आरसा ते ठळकपणे दाखवी कँमेरा फोनचा".

इतके दिवस माझ्या नाकाखाली, माझ्या नकळत, सुगरण बायकोने (ती इथे फेसबुकवर आहे. चांगली active आहे. त्यामुळे ती सुगरण आहे इतकंच सत्य मी उघड करू शकतो) बनवलेल्या आणि अंमळ जास्तच आवडीने खालेल्ल्या सर्व अन्नामुळे, मी कमावलेल्या आणि एकही गोष्ट वाया न घालवण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेने वाचवून ठेवलेल्या कँलरीज, चरबीच्या रूपाने माझ्या मूळच्या सपाट पोटावर घेराव देऊन बसल्या होत्या. पोरी फोटो बघून खूष झाल्या. त्यांच्या खुशीचे कारण त्यांचे छान आलेले फोटो की सरांपेक्षा आपण कित्ती बारीक आहोत याचा स्क्रीनवर दिसणारा पुरावा होता, हे मला अजून कळले नाही. आणि मग सुपीक डोक्याच्या मुलीच्या डोक्यातून अजून एक पीक निघाले की ऑफिस च्या whatsapp ग्रुप ला हा फोटो डी पी म्हणून ठेवायचा. मी कसनुसा हसत होकार दिला. झुक्या बाबाने whatsapp घेतल्यावर डी पी क्रॉप करायची सोय काढली नाही म्हणून त्याचे आभार मानत केवळ हसरा चेहरा दिसेल इतपत फोटो ठेवून बाकीचा अनावश्यक सत्याचा भाग कापून, ऑफिस मध्ये दिवाळी साजरी केली.
घरी यंदा बायकोने फराळाचे वेगवेगळे १२ पदार्थ केलेले असल्याने आणि मी आज्ञाधारक नवरा असल्याने गपचूप सर्व पदार्थ खावेच लागले. त्यात पुन्हा आमच्या सोसायटीतले शेजारी अजूनही फराळ देण्याघेण्याच्या गतकालीन सवयी मोडायला तयार नसल्याने, पदार्थांची संख्या वाढली नसली तरी खाण्याचे प्रमाण वाढले. मी डी पी त लपवलेल्या पोटाचा विचार करीत दिवाळीचा फराळ हाणत होतो.
No comments:
Post a Comment